प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
राज्यातील ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी आपण स्वतः चर्चा करून या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी समाजाच्या शिष्टमंडळास दिली. ब्राह्मण समाज मंडळाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची विजय वरपूडकर यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेण्यात आली. यावेळी विठू गुरु वझुरकर, उद्योजक योगेश जोशी, विश्वंभर काटवटे, प्रमोद वाकोडकर, कृष्णा काळगावकर, मनोज धर्माधिकारी, संजय पाठक, विलास कौसडीकर, अजय हमदापुरकर, संतोष माहुरकर, सुनील हमदापुरकर, सुधाकर गोळेगावकर यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या संदर्भात यावेळी निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने पूर्वहितांना तेलंगणा सरकार प्रमाणे मानधन देण्यात यावे, परशुराम आर्थिक विकास महामंडळ त्वरित स्थापन करावे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात यावे, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, मोफत शिक्षणाची व्यवस्था करून देण्यात यावी, तसेच समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. आधी मागण्यांचा यात समावेश आहे. बावनकुळे यांनी या मागण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सरकारच्या वतीने मागण्या पूर्ण करण्यात येतील अशी आश्वासन दिले