सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. ३० जूलै २०२३ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे असल्याचे मत नागरिकांतून येत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळांमध्ये राबवला जात आहे. परंतू या शालेय पोषण आहाराच्या नावावर राज्यातील विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार दिला जात आहे. याचा प्रत्यय राज्यातील अनेक शाळांमध्ये आला असून बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवण येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आळ्या निघाल्याने गावात खळबळ उडाली असून राज्य सरकार आणि प्रशासन शालेय पोषण आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांना गोडावूनमध्ये अनेक वर्षांपासून पडलेले आळ्या आणि जाळ्या असलेले तांदुळ इतर साहित्य देत आहेत. ज्या तांदळाला जनावरेही खानार नाहीत असे खराब झालेले तांदुळ दाळी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून चारले जात आहेत अशा निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन त्यांच्या जीवितास मोठा धोका होऊ शकतो. वडवणी तालुक्यातील या घटनेमुळे गावातील नागरिक शिक्षणमंत्री, राज्य सरकार आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत.