किरण नांदे
शहर प्रतिनिधी ठाणे
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे -नाशिक महामार्गची पाहणी केली.या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या येत होत्या.यामुळे आज रविवारी मुख्यामंत्रीनी स्वतः प्रत्यक्ष महामार्गची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहेत पाहणी करून तात्काळ खड्डे बुजावण्यात यावे संबंधित अधिक्यांना आदेश देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडिसिचे यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपालवार, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिह,ठाणे वाहतूक उपायुक्त विनय कुमार राठोड आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.


