करामत शाह
ग्रामीण प्रतिनिधी, आगर
अकोला : जिल्यात शुक्रवारी रोजी रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसाने अकोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती तसेच घराचे नुकसान झाले.या भागातील नुकसानीचे बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन बाप्पू देशमुख यांनी नुकसान ग्रस्त गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की संपूर्ण अकोला जिल्याला मुसळधार पावसाने झोडपल्याने सर्वत्र पाणी साचल्याने शेतकऱ्यांची अधिक चिंता वाढली आहे. झालेल्या पावसामुळे शेती तसेच घराचे नुकसान झाले आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून न भरुन निघणारी ही हानी झाली आहे. जिल्ह्यातील अकोला तालुक्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अकोला तालुक्यातील खांबोरा गावाला नदीच्या पुराचा वेढा बसला आहे.त्यामुळे ये जा करण्याचा मुख्य रस्ता पुल पूर्णतः वाहून गेल्याने दळणवळण साधन बंद पडले .तसेच उगवा मंडळ आगर मंडळ या भागातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दरम्यान पुरामुळे शेतजमिन खरडून पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर आता यामध्ये पीक कसे घ्यायचे शेतकऱ्यांपुढे दुपार पेरणीचे उभा राहिला आहे.दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. त्यामुळे आता झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.उगवा आगर मंडळ आगर, उगवा,पाळोदि,खांबोरा,लोणाग्रा,परिसरात झालेल्या अतिवष्टीमुळे आगर ते लोणांग्रा तसेच पाळोदि ते खांबोरा जाणाऱ्या रस्त्यावर चोंडा नाल्याला पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन मुख्य रस्ता खरडून गेल्याने मुख्य मार्गे बंद पडला तसेच परिसरतील सर्वत्र शेती मध्येपाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन बाप्पू देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी अकोला,तहसीलदार, गट विकास अधिकारी अकोला,उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,तालुका कृषी अधिकारी ,तसेच शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख राहुल कराळे,संजय भांबरे,पंकज काळने,सचिन वारकरी,भिकाजी पातोंड, उगवा आगर शिवसेना प्रमुख सचिन बहाकर,मनीष बुटे,तसेच सर्व शिवसैनिक परिसरातील सर्व सरपंच शेतकरी,उपस्थित होते.
चौकट
आगर येथील आनंदी प्रदीप गव्हाळे वय 4 वर्ष या मुलीला अचानक प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने जिल्ह्याचे ठिकाणी हलविण्यासाठी शुक्रवारी आलेल्या नदीच्या पुरातून काढून रुग्णालय हलवण्यात आले.आनंदी हीचे मृत्यूशी झुंज देत अखेर सोमवारी तिचा मृत्यू झाला.यांचे घरी आमदार नितीन
बाप्पू देशमुख यांनी शांत्वन भेट दिली.