विनोद कांबळे
चिफ ब्युरो मुंबई
मुंबई : थोर मुत्सद्दी,प्रखर राष्ट्रवादी,स्वराज्याच्या भूमिकेने भारलेले व इंग्रजांवर कडवट टीका करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त आज कोंकण भवन बेलापूर नवी मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी कोंकण भवनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी ब्रिटीशांसमोर सिंह गर्जना करणारे आणि त्यासाठी अवघा देश ढवळून काढणारे थोर क्रांतीकारक म्हणून लोकमान्य टिळकांकडे पाहिलं जातं.देशप्रेमाची आणि स्वातंत्र्याची चळवळ घरोघरी पोहोचावी यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली.गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे विचार पोहोचू लागले.इंग्रजांच्या धोरणांवर सडकून टीका केल्याने टिळकांना तुरुंगवासही भोगावा लागला.लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. टिळकांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांची सुरुवात केली होती. टिळकांनी भारतात सर्वप्रथम स्वराज्याची मागणी केली होती.