गजानन ढोणे.
ग्रामीण प्रतिनिधी,बुलढाणा
बुलढाणा : 27 जुलै, सवडद लव्हाळा मार्गावर ऋषी बाबाच्या मंदिरालगत सवडद मोहखेड शेत शिवारात रस्त्यावर वयोवृद्ध इसमाचा खून झाल्याची घटना आज दिनांक 27 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार असे समजते सकाळी काही शेतकऱ्यांना लवाळा साखरखेर्डा रोडवर सवडद मोहखेड शेत शिवारात रस्त्यावर एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दरम्यान घटनास्थळी पोलीस पोचले असता सदर इसमाचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता. सोशल मीडियावर सदर मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यावर हा मृतदेह साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या वडगाव माळी येथील केशवराव विठ्ठल भुतेकर वय 60 यांचा असल्याचे उघड झाले.पोलीस प्रशासन सकाळपासून या अज्ञात मृतदेहाचा शोध घेत होते.
दरम्यान सकाळी लवळा फाट्यावरील आचल कृषी केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता यामध्ये दिनांक 26 जुलै रोजी रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यान एक ऑटो रिक्षा सवडद फाटेच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. त्या ऑटो रिक्षाचा शोध घेत पोलीस थेट चिखली येथे पोहोचले दरम्यान पेट्रोल पंपावर सदर ऑटो रिक्षा चालकाने रस्ता कुठे जातो याची विचारणा केली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ऑटो रिक्षा चालक पठ्ठे राहणार चिखली यास ताब्यात घेतल्या असून अधिक तपास सुरू आहे.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी ,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिल्या असून ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार गजानन मुंडे पोलिस ना. अनिल वाघ पोलीस ना. नितीन राजे जाधव हे करीत आहे.सदर खून हा डोक्यात दगड घालून झाल्याने पाच मारेकरी असावेत असा संशय व्यक्त केला जात असून कौटुंबिक कारणावरून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. कारण भुतेकर यांना दोन पत्नी होत्या गेल्या चार-पाच दिवसापासून ते घरून बेपत्ता असल्याची माहिती आहे.











