कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुर्णतः पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच पावसामुळे अनेक लोकांचे घरे नस्तानाभुत झाली असल्याने नुकसानग्रस्तांना सरकारने विनाविलंब भरिव मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारकडे केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलाच सपाटा सुरू केला आहे.२१ जुलैच्या मध्यरात्री पासून संग्रामपूर तालुक्यात सारखा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच अनेक भागात ढगफुटी झाली असल्याने हजारो एकर जमीनी पिकासह खरडुन गेल्या आहेत. संग्रामपूर तालुक्यात शेताला नदि नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. नद्या,नाल्याच्या पुराच्या पाण्याने परिसीमा ओलांडल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरा दारात पाणी आहे. त्यातच एकलारा येथिल मदन पांडुरंग धुळे हे शेतातुन घरी येत असतांना या शेतकऱ्यांचा पाण्यात पाय घसरून वाहुन गेले आहेत. गेल्या १० वर्षातही नुकसान झाले नाही. एवढे नुकसान या २४ तासात पडलेल्या पावसाने केले आहे.विनाखंडीत सतत मुसळधार पाऊस सारखा सुरुच आहे. या भयावह मुसळधार पावसाने सर्वत्र झालेल्या पिकाचे नुकसानीपुढे प्रशासनातील अधिकारी हतबल झाले आहेत. त्याकरिता सरकारने संकटाचे भांडवल न करता सुरू असलेल्या अधिवेशनात सरसकट मदत जाहिर करुन तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर भरिव मदत जमा करावी. अनेक लोकांचे घरे पडले, त्यातील बहुतांश बेघर झाले आहेत. त्याकरिता प्रत्येक गावात पडझड झालेल्या घरांचे नुकसान बाबत तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात यावे व त्यांना उदारनिर्वाह साठी सामुग्री द्यावी. तसेच घर बांधकामासाठी सरकारने तत्काळ स्वतंत्र प्लॅन तयार करावा. या संकटात सरकार जणतेच्या पाठीशी उभे राहणार नसेल तर याची सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल. असा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.