शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यातील पिप्री खुर्द गावात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली यावेळी सरपंच सुवर्णा पांडे यांनी गावात जाऊन पुलांच्या काठाला काळी कचरा काढन्या साठी दोन तीन मजुर सागीले होते परंतु पावसाचा कहर रात्रींचा जास्त असल्यामुळे गावातील नदी,नाल्यांमधून चांगल्याप्रकारे पाणी वाहू लागले मात्र या दमदार पावसामुळे पहाडात झालेले पाणी पिप्री या गावात शिरल्यामुळे गावातील काही घरे व जनावरांच्या गोठ्यामध्ये शिरल्याने या लोकांना त्रास सहन करावा लागला. पिप्री या गावाच्या वरच्या बाजूने वन विभागाचा पहाडी एरीयाआहे या पहाडातून आलेले पुराचे पाणी गावातील रोडला अडून गजानन भेंडे .संजय गिरबिळे याच्या घरामधून घुसून गावात शिरले व रस्त्यालगतच काही लोकांची घरे असल्याने हे पाणी जनावरांच्या कोट्ठ्यामधुन शिरले आहे.मात्र दीनाक १९/७/२०२३रोजी रात्री आलेल्या पावसाने कोणतीही मनुष्य वा प्राणहाणी झाली नाही पण घरातील काही साहित्य कोणाचे टिन.पाण्याच्या टाक्या बकेटा कोणाचे कुटार शेन खत इत्यादी वाहून गेल्याची माहिती मिळाली येथे याबाबत पाहणी करता परीक्षावधीन नायब तहसीलदार विजय सवडे,मंडळ अधिकारी ओईबे ग्रामसेवक ज्ञानेश्वर बिरकड , पिप्री खुर्द येथील तलाठी पल्लवी बोळे पिप्री येथील प्रतिष्ठित नागरिक विठ्ठल पांडे संतोष मगर,विजय जवंजाळ,दत्ता भगत राजेश गावंडे संजय गिरबीले व मित्र ग्राम पंचायत सदस्य श्याम गिरबिळे दुर्योधन जवंजाळ पोलीस पाटील यांनी पिप्री येथे भेट देवून पाहणी केली.या गावात स्थानिक या गावातील काही लोकांच्या अंगणात व दोन-चार घरामध्ये पाणी शिरून निघून गेले. सध्या हे गाव अकोट वाटून 13 कि.मी.आहे.तसेच सातपुड्याच्या कुशीत बसलेले असून त्यामुळे येथील लोकांना आवश्यक सुविधा मिळू शकतात.ग्रामपंचायत मार्फत नालीची साफसफाई आणि डोंगराचे पाणी वस्तीत येवू नये म्हणून पुलाचे काम करण्यात यावे कारण कोणत्याही जीवीत हानी होणार नाही त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये रोश निर्माण होत आहे.


