मधुकर केदार
शहर प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव: अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील सुमननगर बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रतापकाका ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना साइटवर वृक्षारोपण व प्राथमिक आरोग्य केंद्र हातगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे,संचालक डॉक्टर प्रकाश घनवट,त्रिंबक दादा चेमटे,डॉक्टर सोनाली तिडके व जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर मढीकर,प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे,प्रशासकीय अधिकारी पोपट केदार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते कारखाना साइटवर घेण्यात आले.











