गणेश ताठे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट: बँक ऑफ इंडिया शाखा अकोट येथे दिनांक 19 जून 23 च्या पूर्वसंध्येला नियमित परतफेड करणाऱ्या पीक कर्जदारांचे पुष्प व प्रमाणपत्र “किसान दिवस किसान सन्मान” देऊन कौतुक करण्यात आले. तसेच पीक कर्जाच्या नियमित परतफेडीचे व बचत गटाबद्दल आदरणीय झेड एम सरांच्या देखरेखीखाली. शाखा प्रबंधक क्षितिज गायकवाड, कृषी अधिकारी राहुल अडागडे, कृषी अधिकारी स्वप्निल तळोकार, कृषी अधिकारी श्रीकांत चुंबले यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांन प्रति दाखवण्यात गेलेल्या उदार वर्तनाने शेतकरी भारावून गेले. या कार्यक्रमाला कर्मचारी गौरव देशमुख श्री विवेक काकड स्वप्नील कोरडे हेमंत धरणे रोहित जैन उपस्थित होते.