विश्वास काळे
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड:मागील १२ दिवसापासून
मौजे हडसनी येथे मराठा आरक्षणावर कोणतातरी मार्ग निघावा यासाठी आमरण उपोषण करत आहेत.मात्र सरकारने या गोष्टीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.खाते वाटप मंत्री मंडळ विस्तार ,बंगले पालक मंत्री या सर्व गोष्टीत व्यस्त असून दत्ता पाटील यांच्या उपोषणाचा विसर पडलेला दिसत आहे.आमदार खासदार तसेच शासन स्थरावरून आपल्याला आत्तापर्यंत कुणीही भेट दिली नसल्याचं दत्ता पाटील यांनी सांगितले आहे.या वरून एक गोष्ट लक्षात येते की यांच्या साठी मराठा समाज हा फक्त आकडा आहे.या अगोदर मराठा समाजासाठी लढणारे अनेक मावळे गमावले आहेत.अजून त्यात भर पडू नाही म्हणून आपण करत असलेले उपोषण तूर्तास मागे घ्यावे ही विनंती समाज करत आहे.अशी अपेक्षा जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सरोज देशमुख यांनी सांगितले आहे.


