रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा= हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालयाचा विद्यार्थी अहमद मुस्तफा अली हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तेल्हारा तालुक्यातून प्रथम तर अकोला जिल्ह्यातून सहावा क्रमांक पटकावून हिवरखेड गावाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थ्याने याआधी सुद्धा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत अकोला जिल्ह्यातून खुल्या गटातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. अहमद मुस्तफा अली याच्या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे, संस्थाध्यक्ष अनिलकुमार भोपळे, संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान जेष्ठ संचालक सत्यदेव गिऱ्हे, कोषाध्यक्ष पुखराज राठी आदी संस्थेचे पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन केले. भोपळे विद्यालयाच्या वतीने आयोजित कौतुक सोहळ्यात संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, प्राचार्या रजनी वालोकार, पर्यवेक्षक प्रा.संतोषकुमार राऊत यांच्या उपस्थितीत त्याला मार्गदर्शक शिक्षक सचिन दही यांच्यासह गौरविण्यात आले. या यशाचे श्रेय तो मार्गदर्शक सर्व शिक्षक, शिक्षिका व आई-वडिलांना देतो.