माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर तालुक्यातील जाब खुर्द येथे मागील पंधरा महिन्यापासून रोहीत्र नादुरुस्त झाले होते. गावकऱ्यांनी वारंवार महावितरणच्या कार्यालयात चकरा मारूनही हे रोहित्र दुरुस्त केले नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. दरम्यान शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख अक्षदा चक्कर पाटील यांच्या पुढाकाराने जाब खुर्द येथे रोहीत्र बसवण्यात आले. महावितरण कंपनीने रोहित्र उपलब्ध करून दिल्याने वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. यावेळी हेल्पर अंगद कदम, रुस्तुमराव कदम, संग्राम पिंपळकर, हनुमान कदम, आत्माराम आघाम, राजेश राठोड, रंगनाथ चव्हाण, उद्धव पिंपळकर यांच्या सहाय्याने हे रोहित रात्री आठच्या सुमारास बसविण्यात आले.