डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू: आज दिनांक 14 जुलै 2023 रोजी दुपारी ठीक दोन वाजून 35 मिनिटाला चांद्रयान 3 प्रक्षेपित झाले चांद्रयान-3 यानचे हे प्रक्षेपण पाहताना केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होऊन त्यानी
चांद्रयान तीन मोहिमेचा आनंद घेतला.मोहिमेमध्ये वापरण्यात आलेले रोवर आणि रोबोट कशा पद्धतीने तयार केले गेले याचीही माहिती देण्यात आली कारण साई अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे छोटे छोटे रोबोट तयार करण्याचे तंत्रज्ञान व प्रशिक्षिन शिकविले जाते. हे रोबोटिक तंत्रज्ञान सेलू शहरामध्ये साई अकॅडमीने पहिल्यांदा उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी साई अकॅडमीचे संचालक संतोष नारवाणी यांनी केले.


