रामराव आव्हाड
ग्रामीण प्रतिनिधी, पाचलेगाव
जिंतूर : तालुक्यातील पाचलेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय पाचलेगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे संस्थाचालक सन्माननीय जयस्वाल सर यांच्या अध्यक्षतेखाली राज भैया आव्हाड यांच्या हस्ते घेण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज भैया आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड ही आजच्या काळाची का गरज आहे. या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले झाडे जगली तरच पृथ्वीतलावरील सर्व सजीव जात जगेन. त्यावेळी त्यांनी असेही सांगितले की अमेरिकेमध्ये 200 वर्षापासून एकदाही दुष्काळ पडला नाही त्याचं कारण अमेरिकेमध्ये दर मानसी 2876 झाडे तर आपल्या भारतामध्ये दर मानसी फक्त 28 झाडे लावली जात आहेत. त्यामुळे हवेतील ओझोन वायूचा थर कमी होऊन जमिनीतील पाण्याची पातळी सुद्धा कमी होत आहे. आणि अशा ग्लोबल वाढीमुळे तापमानामध्ये वाढ होत आहे असे झाल्यास. आपल्या सभोवतालचे जे बर्फाळ प्रदेश आहेत त्या प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पाण्याची पातळी वाढवून त्या समुद्राच्या उंबरठ्यावरती राहत असलेले अनेक शहरे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून असंख्य लोकं त्या पाण्यामध्ये जाऊ शकतात असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांपर्यंत सांगितले. मनात एकच आज वृक्ष लागवडीचा ध्यास ही घोषणा देत. आणि झाडे लावा झाडे जगवा असेही ते त्यावेळी म्हणाले.
तसेच कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय शिंदे सर ,राठोड सर ,किरण सर, ज्ञानेश्वर आव्हाड (उपसरपंच पाचलेगाव) तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.