सय्यद जूल्फेखार अली
ग्रामीण प्रतिनिधी बीड
नेकनूर : राज्यात गुटखा बंदी असतानाही पर राज्यातून जिल्ह्यात गुटखा येऊन मोठ्या प्रमाणात विक्री केला जातो.पोलिस प्रशासन वारंवारं या प्रकरणी कारवाई करून देखील गुटखा राज्यात प्रवेश करतोच कसा असा प्रश्न वारंवार निर्माण होतआहे. गुटखा विक्री चालू असताना जेवढा गुटखा राज्यात विकला जात नाही तेवढा गुटखा बंदी असताना विकला जात असल्याचे समोर येत आहे
अशातच आज नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी सापळा लावत हा पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये १६ लाख ४२ हजार २५० रुपयांचा गुटखा आढळून आला. पिकअप जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुटखा मालकासह तिघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक माहिती अशी की, कृष्णा अनंत काळे (वय २२ रा.शिदोड ता.बीड), ऋषीकेश राजकुमार गुंजाळ (वय २६ रा.चौसाळा ता.बीड) या पिकअप चालकासह गुटखा मालक विशाल बाजीराव नौशेकर (रा.चौसाळा, बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातून गुलबर्गा येथून सोलापूर-बीड रोडने गुटखा घेवून पिकअप (एमएच-२३, यू-४९१२) येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. विलास हजारे यांनी खाजगी वाहनातून कर्मचार्यांना पाठवत सापळा लावत हा पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला १६ लाख ४२ हजार २५० रुपयांचा गुटखा आढळून आला. पिकअपसह २३ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे, पोह.प्रशांत क्षीरसागर,अनिल राऊत, बालासाहेब ढाकणे,यांनी केली.


