शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : येथील प्रसिद्ध त्वचाविकार तज्ञ डॉ. शैलेश शिवनारायण मालाणी यांनी सिंगापूर येथे ता.६ ते ८ जुलै २०२३ रोजी संपन्न झालेल्या २५ व्या “वर्ड कॉंग्रेस ऑफ डर्मेटॉलॉजी” या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवुन त्वचाविकारावरील सात महत्वपूर्ण विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन केले. मे२०२३ मध्ये त्यांची या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली होती. या परिषदेत भारतातील ५५० तर, जगभरातील अनेक देशातून जवळपास नऊ हजार त्वचाविकार तज्ञ सहभागी झाले होते. त्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील सहभागा मुळे परभणी जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या परिषदेसाठी त्यांना डॉ.तपीश खियाणी (हिंगणघाट),डॉ.स्वागत शहा(नंदुरबार),डॉ.संजय गोरे, डॉ.चेतन राजपूत(धुळे),डॉ.महेश उन्नी(लातूर),डॉ भूषण मडके (वर्धा),डॉ.मंगेश निकम (कराड),यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.











