माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर : सर्व सामान्य नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावा यासाठी माजी.आमदार.विजयराव भांबळे यांनी श्री. सरोदे तहसीलदार यांच्या दालनात विविध विषयावर बैठक घेतली व सर्व विषय तात्काळ मार्गी लावावेत आशा सूचना दिल्या.जिंतूर तालुक्यातील सर्व समान्य नागरिकांची कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असून त्यात विद्यार्थी यांचे उत्पन्न प्रमाणपत्र, ई डब्ल्यू एस, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर व विविध प्रमाणपत्रे तात्काळ निर्गमित करणे, अनेक शेतरस्ते, शिवरस्ते व पांदन रस्ते लोकांनी अतिक्रमण करून बंद केल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यास त्रास होत आहे. राष्ट्रीय अर्थसाह्य योजना, नैसर्गिक आपत्ती मधील अनुदान तसेच श्रावण बाळ व विविध अनुदान योजनेचे प्रश्न तसेच अपंग व्यक्तींना अंत्योदय योजनेचे राशन कार्ड, इतर राशन कार्ड अनेक दिवसापासून तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या सर्व समस्या घेऊन मा.आ.विजयराव भांबळे यांनी तहसीलदार श्री सरोदे यांच्याशी त्यांच्या दालनात बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा करून नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी बैठकीस प्रसादराव बुधवंत, रामराव उबाळे, मधुकर भवाळे, संजय निकाळजे, चंद्रकांत बहिरट, विजय वाकळे, जलील इनामदार, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.