रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ पर्यत आहे. तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड यांनी माहिती दिली की,प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2023-24 चा पीक विमा भरणे सुरू झाले आहे.दुष्काळ,अपुरा पाऊस,पावसातील खंड, पूर, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव,भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकाच्या उत्पन्नात येणाऱ्या घटि पासून व्यापक विमा सरंक्षण या योजनेद्वारे शासनातर्फे शेतकऱ्यांना दिले जाते.पीक विमा काढण्या करिता लागणारे कागदपत्र बँक पासबुक, आधारकार्ड स्वघोषित पिक पेरा प्रमाणपत्र सातबारा हे आहेत. सन २०२३-२४ पासून सर्व समावेशक पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ १ रुपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे. खरीप हंगाम २०२३ करीता तेल्हारा तालुक्यात एच.डी.एफ.सी. अरगो जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनी कडून राबविण्यात येणार आहे. या विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक18002660700 हाआहे तरी तेल्हारा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यवा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड यांनी केले आहे.