रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या ९ वर्षातील सेवा सुशासन आणि गरीब कल्याण योजनेची माहिती भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवून दिली जात आहे.या अनुषंगाने प्रदेश सरचिटणीस आमदार रणधिर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका आरतीताई गायकवाड व शहर सरचिटणीस गजानन गायकवाड या दाम्पत्याने इंदिरा नगरातील मोतीबिंदूग्रस्त रुग्णांची मोफत मोतीबिंदू,परदा शस्त्रक्रिया करून
सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या इंदिरा नगरातील भाजपच्या माजी नगरसेविका आरतीताई गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते तथा शहर सरचिटणीस गजानन गायकवाड या दाम्पत्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षातील सेवा सुशासन या निमित्ताने शहरातील मोतीबिंदूग्रस्त नेत्र रुग्ण कलावती बोदडे,प्रल्हाद बाभुळकर, वासुदेव गावत्रे,देवीलाल कनोजी,इस्माईल शाह, करीम शाह यांच्या निशुल्क मोतीबिंदू,परदा शस्त्रक्रियासाठी आरतीताई गायकवाड, गजानन गायकवाड यांनी पुढाकार घेऊन गुरु पौर्णिमेच्या पर्वावर नांदुरा येथील तिरुपतीबालाजी संस्थान द्वारा संचालित मोहनराव नारायण नेत्रालय हॉस्पिटल मध्ये स्वखर्चाने नेण्याची सुविधा उपलब्ध करून निर्विघ्न पणे उपरोक्त शस्त्रक्रिया पार पडली. हे उपक्रम राबवून समाजाप्रती आपले काही देणे लागते या सद भावणीतून आपल्या सेवावृत्तीचा परिचय दिला गरजू व गोरगरिबांना विविध शासकीय, कल्याणकारी योजनांची माहिती देणे सल्ला देणे प्रत्यक्ष मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. सदर शस्त्र क्रिया दरम्यान तेल्हाऱ्या तील सेवाभावी कार्यकर्ते शिवाअमृतकार , सनी सोनवणे सचिन तावरे यांनी रुग्णांची सेवा केली.