शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड : युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच नॅशनल स्पोर्ट्स प्रमोशन ऑर्गनायझेशन मान्यता प्राप्त स्टेअर्स फाउंडेशन च्या अमरावती विभाग प्रमुख पदी सागर शेरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना मिळावी, ग्रामीण भागातील खेळाडू राज्य राष्ट्रीय पातळीवर खेळावे या हेतूने ही निवड करण्यात आली आहे.
भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय मान्यताप्राप्त स्टेअर्स फौंडेशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील जिल्हा आणि तालुका स्तरावर विविध खेळांच्या क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांना एकत्रित घेऊन तळागाळातील होतकरू, मेहनती खेळाडु यांना विविध मान्यताप्राप्त खेळांच्या माध्यमातून शिबिर आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका आणि जिल्हा स्तरावर आयोजित शिबिर, कार्यशाळा च्या माध्यमातून विजयी खेळाडु यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करण्यात येत आहे.
भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय मान्यताप्राप्त स्टेअर्स फौंडेशन च्या विविध खेळांच्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील निवडक, विजयी खेळाडू यांना आगामी काळात स्कुल गेम्स, खेलो इंडिया, आंतरविद्यापीठ स्पर्धा तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI ) इत्यादी विविध मान्यताप्राप्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहेत