सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा : कास पठाराकडे जाणाऱ्या येवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली. ती एका दुचाकीवर कोसळली. जिवावर बेतलं परंतु प्राण वाचले. या घटनेमध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे. तीन दिवस या परिसरामध्ये संतत पाऊस चालू असल्यामुळे, डोंगरावरून पाण्याचा ओघ वाढत आहे. त्यामुळे आता ठीक ठिकाणी दरडी कोसळयला सुरुवात झाली आहे. याच घाटातून कास परिसरात पर्यटकांची सतत वर्दळ असते. अचानक कोसळलेल्या दर्डीमुळे संपूर्ण रस्त्यावर दगड मातीचा खच पडला आणि वाहनांना दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे, कास पठार पाहण्यासाठी गेलेल्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. दगड माती हटवण्यासाठी उशीर पर्यंत कोणतीही शासकीय मदत पोहचली नव्हती. त्यामुळे काही वाहन चालक नागरिकांनी ते दगड हटवण्यास सुरुवात करून वाट मोकळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु बराच वेळ वाहन घाटातच अडकले होती.


