मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : इसाफ बँक भंडारा शाखेच्या वतीने दुर्गा मंदिर, टाकळी येथे येथे बालज्योती उन्हाळी शिबिराचा पहिला दिवस आयोजित करण्यात आला होता. बाला ज्योती क्लबच्या उन्हाळी शिबिराच्या पहिल्या दिवशी एकूण 101 मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी जनसेवक पवन मस्के यांनी उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.महेंद्र सहारे, क्लस्टर हेड नागपूर, प्रमुख पाहुणे श्री.पवन मस्के, सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस नेते श्री.अमित दास, वरिष्ठ व्यवस्थापक सामाजिक उपक्रम, श्री.चक्रधर माकडे, CSM भंडारा. भावेश नागपुरे मॉर्निंग योगा आणि मेडिटेशन सेशन घेण्यात आले, गुड टच आणि बॅड टच, वैयक्तिक स्वच्छता हे विषय कु. बरखा पाटील आणि सौ. सुनीता वानखेडे यांनी मुलांसोबत शेअर केले, काही खेळही त्यांनी घेतले. मुलांनी नृत्य सादर केले, दुपारच्या सत्रात श्री सचिन कोहाड ब्रांच मॅनेजर यांनी आर्थिक साक्षरता सत्र घेतले. शिबिरात सर्व मुलांनी नृत्य व खेळाचा आनंद लुटला.