मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : जिल्हा काँग्रेस कमिटी, यांच्या संयुक्त विद्यमाने आज 30 जून 2023 ला एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर आंदोलन हे धनराज साठवणे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झाले.सध्या शहरातील भुयारी गटाराचे जाळे टाकण्याचे कार्य अत्यंत कमकुवत व दर्जाहीन होत असल्याने नगरपरिषदे ने भंडारा शहरातील सर्व रस्ते विद्रूप,गटाराचे स्वरूप दिलेले आहे. शहरांमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असूनही शहराचा विकास दिशाहीन शहर नेतृत्व हीन अवस्थेमध्ये पोहोचला आहे. नगराध्यक्षांचा पत्ता नाही, त्यांना जबाबदारीचे भान नाही, शहरात आमदार असून त्यांना शहराच्या सोयी सुविधांपेक्षा निवडणुकांचे वेध लागलेले आहे, परिणामी भर पावसाळ्यात जनतेमध्ये आक्रोश व हाहाकार माजलेला आहे, जनप्रतिनिधींना फक्त मतांची बिधागी जमवण्यात वेळ चालला आहे.जनप्रतिनिधी अंधभक्त आणि स्वार्थी फक्त भ्रष्टाचाराच्या स्पर्धेमध्ये कोण वरचढ ठरतो की काय अशी परिस्थिती आज शहरांमध्ये झालेली आहे. अशा प्रकारचे कटाक्ष धनराज साठवणे यांनी केलेआहे.प्रशासनावर कुणाचाच वचक व नियंत्रण राहिलेले नाही, परिणामी नगर परिषदेचे प्रशासक विनोद जाधव हे अनियंत्रित कार्यभार हाकलत आहेत, आणि कार्यभार करीत असताना ते कुणाचेही मत विचारात घेत नाही. किंवा जनतेच्या मतांना योग्य महत्त्व देत नाही,सूचनांचे तर राहू द्या नगरसेवकांनी नागरिकांनी नगरपरिषदेणे कार्यभार प्रशासन मोकाट सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कर्मचारी आणि सुख सुविधा पुरवणारे कंत्राटदार मोकाट सुटलेले आहेत.प्रशासन कंत्राटदार आणि सत्ताधारी प्रतिनिधी यांच्यात कोणते साठे लोटे आहेत किंवा सबंध आहेत याचा थांगपत्ता लागत नाही असे टीका जिल्हा महासचिव लखनलाल चौरे यांनी केली आहे.तसेच त्यांनी केलेल्या चौकशीला व उच्चस्तरीय चौकशीला जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.आणि आजच्या धरणे आंदोलनाची दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आणि कंत्राट दारावर कार्यवाहीचे आश्वासन दिले. आजच्या धरणे आंदोलनामध्ये प्रेम सागर गणवीर माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रशांत देशकर , जयश्री बोरकर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष,नरेंद्र मानापुरे शहर सचिव,महेंद्र वाहने,स्नेहा भोवते तालुकाध्यक्ष भंडारा इंटर गीतांजली घरडे,तालुका अध्यक्ष इंटर सुनील घुगे, पुणे अध्यक्ष नरेश चंद्र कावडे, पृथ्वीराज तांडेकर नेमूत खान सोहेल अहमद रवींद्र थरथराट जीवनभजाकर जीवन भजन कर नरेंद्र साळवे पवन मस्के जमीन शेख माजी नगरसेवक स्वातीताई हेडाऊ भंडारा तालुकाध्यक्ष महिला नम्रता बागडे भावेश वसंता नागपुरे तालुकाध्यक्ष इंटक भंडारा निखिल तिजारे विकास सेलोकर सरिता मदनकर नरहरी नरहरी सर्वे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.