शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : पञकार हा समाज तथा राष्ट्राचा आरसा असतो. लोकशाहीमधील मूल्ये आणि तत्वे अबाधित राखण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते.सध्या देशातील राजकीय परिस्थिती पञकारीतेला अनुकूल आहे,असे चित्र दिसत नाही.घडते काय आहे आणि काय दाखवील्या जात आहे? त्यामुळे अनेकांनी प्रसारण माध्यमावरील बातम्या दृकश्रवण करणे सोडले आहे.प्रसारमाध्यमे,वृत्तपञे प्रचंड दबावाखाली असल्याचे बोलले जात आहे.अशाही स्थितीत दबाव तंञाला झुगारून काही पञकार निर्भयतेने सत्य उजेडात आणण्यासाठी जोखीम पत्करत आहेत,हीच खरी पञकारीता आहे,असे विचार प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष,कवी विठ्ठल कुलट यांनी व्यक्त केले. आकोट तालुक्यातील ग्राम कवठा बु.येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पञकार संघ,आकोट तालुक्याच्या वतिने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक,साहित्यिक तथा पञकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी पञकार संघाचे तथा समारंभाचे अध्यक्ष गजाननराव वाघमारे,पञकार राजेश डांगटे, अनंतराव गावंडे,अॅड.नरेंद्र बेलसरे यांनी समयोचित विचार मांडलेत.याप्रसंगी कमलेश राठी,सरपंच देवानंद रावणकार, उपसरपंच सौ.अलका प्रमोद धांडे, प्रा.डाॅ.साहित्यिक अनंतराव मरकाळे,पोलीस पाटील सुनील बिहाडे, चंद्रशेखर महाजन,शाळा व्यवस्थापन समितीचे विजय रावणकार तसेच तालुकाध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर उपाध्यक्ष राजेश साविकार इत्यादींची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. इयत्ता दहावी व बारावी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर यांनी,संचालन बौद्ध विचार प्रसारक,कवी विजय धांडे यांनी तर आभार प्रदर्शन राजेश साविकार यांनी केले.कार्यक्रमास पत्रकार नरेंद्र कोंडे काशिनाथ कोंडे, अहमद भाई विठ्ठलराव येवोकार, नरेश पुनकर,प्रकाश आमले, देवानंद आग्रे, राहुल पाचडे, योगेश लबडे,गोवर्धन चव्हाण,दत्ता भगत संजय जवंजाळ गुरुदेव सेवा मंडळाचे बाळकृष्ण रावणकार, रामदास साविकार रामेश्वर कवडे, उत्तमराव रावणकर, संजय रावणकार हरिदास वाघ, दिलीप साविकार, बंडू साविकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर, उपाध्यक्ष राजेश साविकर यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन चांदुरकर,गजानन साविकार, प्रणव मानकर, अनिकेत मानकर, विनोद सांगळे,अनिल रावणकार, विजय रावणकार,ऋषिकेश नेसनेतकावर, समीर शेख,प्रकाश धांडे, मयुर साविकार,विट्ठल कवडे,श्रेयश साविकार इत्यादींनी कार्यकमाच्या यशस्वतीते करिता परिश्रम घेतले.


