बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : दौंड तालुक्यातील सेवानिवृत्त महसूल अधिकारी म्हणून नावाजलेले राजेंद्र म्हस्के साहेब हे थोड्याच दिवसात तेलंगणाचे मुख्यमंत्री मा. ना. के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बी आर एस पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.. ते पुढे म्हणाले की, दौंड तालुक्यातील जनतेला चांगला आणि सक्षम तिसरा पर्याय म्हणून मी बी आर एस पक्षाच्या माध्यमातून विधानसभेसाठी निवडणुकीचे रिंगणात स्वतः उतरणार आहे. मी महसूल विभागातील दौंड तालुक्यातील महत्वाच्या पदांवर म्हणजे १) मंडल अधिकारी वरवंड २) दोनवेळा मंडल अधिकारी पाटस या पदावर (सन २०१२ ते २०१५ आणि परत २०१७ ते २०१९) ३) मंडल अधिकारी रावणगांव ४) दौंड तालुका पुरवठा अधिकारी आणि ५) प्रभारी निवासी नायब तहसिलदार…. अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर असताना जनतेची कामे केलेली आहेत. दौंड तालुक्यातच माझी एकुण ३५ वर्षे बाहेर तालुक्यात ५ वर्षे अशी एकुण माझी ४० वर्षे सेवा झालेली असल्यामुळे आणि अनेक वर्षांपासून काम केल्याले असल्यामुळे दौंड तालुक्यातील जनतेशी माझी वैयक्तिक नाळ जोडली गेलेली आहे. संपूर्ण दौंड तालुका माझ्या परिचयाचा आहे, दांडगा मित्रपरिवार आहे. सध्या मी तालुक्यातील ग्रामस्थांच्या सर्वच सुखदुःखात सहभागी होऊन त्यांची विचारपूस करून अडी अडचणी सोडवुन मदत करत असतो व त्यास मला दौंड तालुक्यातील जनता भर भरून साथ देत आहे त्यामुळे माझ्या ओळखीमुळे २०२४ च्या विधानसभेत माझा विजय हा निश्चित मानला जात आहे. तालुक्यातील जनतेने मला उद्याच्या होणाऱ्या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून द्यावे असे आव्हान देखील त्यांनी केलेले आहे. तालुक्यातील जनतेने भाकरी फिरवावी अशी मी या जनतेला साद घालत आहे. असेही ते म्हणाले. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर जनतेची शासकीय कामे अधिकारी स्वतः लोकांच्या घरी जाऊन करतील.
विकास कामाबाबत ते पुढे म्हणाले की, दौंड तालुक्यातील आणि दौंड शहरातील झालेले रस्त्यांची दुरावस्था, दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात फक्त बोटावर मोजण्या एवढीच महाविद्यालये आहेत…. उदाहरणार्थ दौंड कॉलेज, स्वामी चिंचोली हद्दीतील दत्तकला महाविद्यालय, आणि वरवंड येथील महाविद्यालय याव्यतिरिक्त तालुक्यात कोठेही महाविद्यालय नाहीत तसेच ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक सुविधेचा अतिशय अभाव आहे त्या मुलांना शिक्षणासाठी बारामती, पुणे ,इतर शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ५ ते १० गावांकरता मध्यभागी शैक्षणिक संकुल उभारण्याचा माझा मानस आहे. तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना पूर्ववत करणे, दौंड शहरातील आणि एसआर पी एफ आणि रेल्वेने काही कारण नसताना जनतेच्या जमिनी जास्त संपादन केलेल्या आहेत त्या मूळ मालकाला परत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच 50 ते 60 वर्ष दौंड शहरातील प्रलंबित असणारा प्रश्न म्हणजे मंडईमध्ये पुराचे पाणी जात आहे त्यासाठी उपाययोजना करणे दौंड तालुक्यात मध्यभागी ठिकाणी आय टीआय प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे दौंड तालुक्यात कृषी महाविद्यालय बी एस सी, एम एस सी तसेच बी एड ,डि एड .शिक्षणाची सोय करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.त्यामुळे तालुक्यातील मुलांना फायदा होणार आहे. तसेच पाटस या गावात एसटी स्टँड इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे दौंड तालुक्यातील सर्व ओढ्यांचे खोलीकरण करणे व त्या ओढ्यांवर बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले व पुढे म्हणाले की मला महसुली व भूमि अभिलेख व इतर खात्यांमध्ये काम केल्यामुळे आणि कामाचा दांडगा अनुभव असल्याने शेतकऱ्यांची रखडलेली कामे सोडविण्यात काहीही अडचण येणार नाही.तसेच मी दररोज जनतेच्या सेवेसाठी हजर आहे लोकांनी मला २४ तास कधीही मदतीसाठी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे….!


