बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर : थकीत एफ आर पी साठी रयत क्रांती संघटनेचे बिजवडी (इंदापूर) कर्मयोगी साखर कारखान्यावरती 1 जुलै 2023 रोजी आंदोलन होणार आहे. सन 2022/ 23 साल चा ऊस गाळप हंगाम संपून 3 महिने झाले परंतु अद्यापही कर्मयोगी साखर कारखान्याने उसाची एफ. आर.पी. दिलेली नाही. संपूर्ण राज्यांमध्ये 21 कारखान्यांनी एफ.आर .पी. दिली नाही त्यापैकी 11 कारखाने ही एकट्या पुणे जिल्ह्यातील आहे. पुणे जिल्ह्यामधील कारखानदारांनी 189 कोटी 85 लाख 93 हजार रुपये थकवलेले आहेत.
सर्वात जास्त एफआरपी थकवणारे कारखाने मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांचे आहेत.त्यापैकी कर्मयोगी इंदापूर 48 कोटी 38 लाख 18 हजार रुपये.दौंड, शुगर 32 कोटी ५२ लाख 85 हजार रुपये. विघ्नहर 24 कोटी 59 लाख 87 हजार रुपये. बारामती ॲग्रो 17 कोटी 56 लाख 68 हजार रुपये. घोडगंगा 17 कोटी 40 लाख 95 हजार रुपये.निराभिमा 14 कोटी रुपये. श्री छत्रपती 10 कोटी 6 लाख 41 हजार रुपये. पराग ऍग्रो 10 कोटी 2 लाख.श्री साई प्रिया शुगर (भीमा पाटस) 5 कोटी 94 लाख 20 हजार. राजगड 5 कोटी 54 लाख 86 हजार रुपये.श्रीनाथ म्हस्कोबा 3 कोटी 79 लाख 93 हजार रुपये. वरील सदर थकबाकी 15 जून 2023 पर्यंतची आहे.अशा प्रकारे मोठमोठ्या राजकीय पुढार्यांच्या ताब्यातील कारखानदारांनी एफ.आर. पी. थकूऊन शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे.
कारण सध्या शेतकऱ्यांना नविन पीक उभे करण्यासाठी शेतीला भांडवल लागते, तसेच मुला मुलींच्या शाळा ,कॉलेज भरलेले आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेजच्या फी साठी सुद्धा शेतकऱ्यांना पैसे लागतात. परंतु कारखानदार बेजबाबदार पणे वागून शेतकऱ्यांच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेतात. सदर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती पक्ष,संघटनेतर्फे 1 जुलै 2023 रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी. तालुका इंदापूर येथील कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन होणार आहे.
वेळप्रसंगी या आंदोलनासाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे येण्याची शक्यता आहे.असे भानुदास शिंदे.प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती पक्ष यांनी सांगितले आहे.तसेच रयत क्रांती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश देवकर यांनी साखर आयुक्त पुणे,तहसीलदार इंदापूर, पोलीस निरीक्षक इंदापूर, आणि कर्मयोगी साखर कारखाना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.