निशांत सोनटक्के
शहर प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा : स्थानिक गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथील वर्ग 9 ची विद्यार्थिनी कु. अंबिका विलास म्यॅनमवार हिने गगन भरारी घेत कराटे या खेळ प्रकारात उत्तम कामगिरी करीत लंडन पर्यंत मजल मारली आली आहे. लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप करीता अंबिकाची निवड झाली आहे.अंबिका हिने शाळेच्या व पांढरकवडा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियन स्पर्धेत तिने प्रतीस्पर्ध्यावर मात करीत लंडन येथे होण्याऱ्या स्पर्धेकरिता आपले नाव नोंदले आहे. गुरुकुल शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकरीता प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा प्रत्येक विद्यार्थ्याला विशेष महत्त्व देऊन त्याला खेळण्याकरीता प्रवृत्त करीत असते. त्याचीच पोचपावती म्हणजे अंबिकाची लंडनवारी होय.
अंबिका ने नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय चॅम्पियन स्पर्धेत रौप्य पदक मिळवीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले. त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दोन सुवर्णपदक प्राप्त केले तसेच आता नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या इंडिया ओपन इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा 2023 मध्ये झालेल्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत लंडन येथे होणाऱ्या पुढील स्पर्धेकरीता ती पात्र ठरली आहे.
अंबिकाच्या या लंडन पर्यंतच्या प्रवासाकारिता , यशाकरीता तिला तिचे पालक , कराटे खेळाचे प्रशिक्षक अनिल चावरे , खुशाली अनिल चावरे, गुरुकुल शाळेचे सर्व संस्थाचालक, प्राचार्य स्वप्नील कुळकर्णी, उपप्राचार्य अमित काळे, सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.अंबिकाच्या या उत्तुंग यशाबद्दल अंबिकावर सर्वच स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


