सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
सिंदेवाही (मरेगाव) : मरेगावच्या सरपंच पदाची निवडणूक दिनांक 23 जून रोजी ग्रामपंचायात कार्यालय मरेगाव येथे पार पडली. सरपंच पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत विरोधी पक्ष्याच्या उमेदवारावर भारी पडत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार बहुमताने विजय संपादन करीत सरपंच पदावर संदीप ठाकरे विराजमान झाले. सविस्तर वृत्त असे सिंदेवाही तालुक्यातील ग्राम पंचायत मरेगाव मधील सरपंच वर शासकीय जमिनीवर असलेले अतिक्रमण असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची करावाही करण्यात आली. होती. त्यामुळे सरपंच पदभार उपसरपंच कडे होता. निवडणूक आयोगाने रिक्त असलेल्या ग्रामपंचायत च्या जागेवर पुन्हा निवडणुका घेतल्या व या निवडणुकीमध्ये संदीप ठाकरे यांनी विजय संपादन केला. मौजा मरेगाव मधील 7 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदाचे दावेदार असणारे संदीप ठाकरे यांच्या बाजूने ग्रामपंचायत मधील 4 सदस्यांनी कौल दिला. तर विरोधी पक्षाकडे केवळ 3 सदस्य संख्या असल्याने संदीप ठाकरे हे सरपंच म्हणून विजयी झाले. या निवडणुकी साठी अस्थयी निवडणूक अधिकारी म्हणून चिडे साहेब व तलाठी नागपुरे साहेब यांनी निवडणूक घेतली. व निवडणूक शांत चित्ताने पार पडली,गावात निवडणुकीच्या वेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंदेवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण सहित मार्गदर्शनात पोलीस सहकारी रणधीर मंदारे , मंगेश श्रीरामे , राऊत साहेब , सुरपाम साहेब व नेऊलवार यांनी
यांनी चोख बंदोबस्त ठेवला.व निवडूकप्रकिया शांत चित्ताने पार पाडण्यास सहकार्य केले.


