विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : मार्च 2023 मध्ये प्रचंड गारपीट होऊन उमरखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्याचा सहकारी नोंदी झाले आहेत व शासनाने बाधित शेतकऱ्यांना आपात्कालीन निधी वितरित करण्याच्या आदेशही शासनाने काढले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला नाही सध्या खरीप पीक पेरणीची वेळ आहे त्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत आवश्यकता आहे तरी आपण तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश आपल्या यंत्रणेस द्यावेत खरीप पिक पेरणी अगोदर एक आठवड्याच्या आत बाधित शेतकऱ्यांना निधी उपलब्ध झाला नसल्यास आमच्या सर्वांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशी नोंद घ्यावी अशी विनंती बळवंतराव चव्हाण सचिव वसंत ऊस उत्पादक संघ संतोष पाखरे सचिव किसान मंच संघ डॉक्टर गणेशराव घोडेकर अध्यक्ष वसंत ऊस उत्पादक संघ यांनी दिला आहे.