रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : स्थानिक श्री गजानन महाराज महाविद्यालयात आज दिनांक 21जून 2023 ला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये परिसरातील 12 वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करीअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.गौतम इंगळे सर होते. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति म्हणून प्रा.कल्पना अस्वार, प्रा. प्रिया वालचाळे, प्रा.निखिल भड, प्रा.ढाकरे सर इत्यादी उपस्थित होते. यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी प्रा. ढाकरे, प्रा. भड, प्रा. अस्वार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे आवाहन केले. व महाविद्यालयात असलेल्या अभ्यासक्रमविषयी माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वडाळकर सर यांनी केले व प्रसंगी योगविषयी सुद्धा माहिती दिली. तसेच हागे मॅडम यांनी
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेलगोटे सर , हागे सर, भोपळे मॅडम, गवारगुरू मॅडम व मनिष ताळे, कुमुदिनी ढेंगेकर ताई यांनी सहकार्य केले.यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.