कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ खुर्द गावाजवळील 140 गाव पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन गेली आहे. हीच पाईप लाईन टाकलेल्या व्हॉल्व्ह जवळून जात असताना हिरू प्रमोद गिरी याच्या पायाला चावा घेतला. रात्री दहा वाजता पाय दुखत असल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यामुळे वडील प्रमोद गिरी यांनी हिरूला जळगाव जामोद येथील खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी हिरूची तपासणी केल्यानंतर त्याला सर्पदंश झाल्याचे निदान झाले.त्यांना तातडीने खामगाव येथील रूग्णालयात हलविण्यास सांगितले.खामगावला पोहोचण्यापूर्वीच त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.18 जून रोजी शवविच्छेदनानंतर स्थानिक स्मशानभूमीत
त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निवाणा चांगेफळ गट ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे वरील भागात पाणी मुरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली असून सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावरही वाढला आहे. याकडे लक्ष देऊन सदर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.


