मधुकर केदार
शहर प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव पोलीस दुरक्षेत्रात पोलीस कर्मचाऱ्यांसमोर पत्रकारला मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्ती विरोधात पत्रकार सुरक्षा कायदा 2019चे कलम 3व 4प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवार दि.15रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. पत्रकार सुरक्षा कायदा अन्वये तालुक्यात प्रथमच असा गुन्हा दाखल झाला आहे. दीपक भीमराव तागडे रा. बोधेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने पत्रकारला केलीली दादागिरी भोवली आहे. याबाबत पत्रकार बाळासाहेब खेडकर यांनी फिर्याद दिली आहे .
श्री. खेडकर हे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राच्या समोरून जात असताना दुरक्षेत्राच्या आवारात लोकांची गर्दी दिसली म्हणून ही गर्दी कशाची आहे हे पाहण्यासाठी तेथे गेले होते, त्यावेळी त्याठिकानी एका खाजगी व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम सुरु होता. तेथे पो. ना. संतोष धोत्रे हेही उपस्थित होते. पत्रकार खेडेकर यांना तेथे पाहताच दीपक भीमराव तागडे याने तू पत्रकार पत्रकार येथे कशाला आलास तू बाहेर हो असे म्हणत त्यांची गचाडी धरून तोंडात मारल्या व परत जर येथे थांबलास तर तुझे हातपाय तोडून जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. पोलीस कर्मचारी संतोष धोत्रे यांच्यसमोर व पोलीस दुरक्षेत्रत हा गंभीर प्रकार घडला. तालुक्यातील पत्रकारांनी याबाबत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी भेट घेऊन गुन्हा दाखल करण्यात भाग पाडले व आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.पुढील तपास स.पो.नि. विश्वास पावरा साहेब करत आहेत.


