6 आरोपींना अटक , खापरखेड्यात खळबळ उडाली
वाहिद शेख
तालुका प्रतिनिधी सावनेर
सावनेर : अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक विभाग, नागपूर ग्रामीण आणि खापरखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी रात्री खापरखेडा परिसरातील चिचोली पंचायत हद्दीतील अण्णा मोड कोराडी रोडवर असलेल्या सिव्हिल लाईन परिसरात छापा मारला. यादरम्यान देहव्यापार अड्डा चालवणाऱ्यासह 6 जणांना अटक करण्यात आले. वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या याच 4 तरुणींना ही ताब्यात घेण्यात आले .सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास एका बनावट ग्राहकाला देह व्यापार अडय्यावर पाठवण्यात आले. बनावट ग्राहक व्यक्तीने सिग्नल दिल्यानंतर नागपूर ग्रामीणच्या पथकाने छापा मारला . त्यानंतर खापरखेडा पोलिस स्टेशनला कळवण्यात आले . पोलिसांनी चंदाबाई हनुमान गुप्ता, अंजू तिलकचंद गुप्ता, आर्यन अजय गुप्ता (22 वर्षे), राहुल तिलकचंद गुप्ता, दोघे रा. जय भोले नगर खापरखेडा आणि मोनू यांना अटक केली. ऐश्वर्या राजपाल बनसोड उर्फ ऐश्वर्या राजपाल बनसोड (20 वर्षे) यांना ही अटक करण्यात आले . तसेच सतीश , फुळेश्वर , प्रज्वल हे ग्राहक आहे .चार आरोपी ग्रा