सचिन कांबळे
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर – तहान लागल्यावर विहिर खोदण्यापेक्षा अगोदरच पाण्याची सोय करावी म्हणजे भविष्यात अडचणी येणार नाही. त्याप्रमाणे उद्याच्या सावलीकरीता आज झाडे लावावी. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, भावीपिढी निरोगी राहण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र.2 मध्ये नगर फौंडेशन आणि गिरीकर्णिका ग्लोबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 100 झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे, वनरक्षक राजश्री राऊत, फौंडेशनचे रविंद्र गोरे, गिरीकर्णिका ग्लोबल फौंडेशनचे जगदीश शिंदे, राजेंद्र खेडकर, धनंजय मोकासे, सचिन कडूस, आशिर्वाद चव्हाण, सतीश वाळके, सोपान तोडमल, प्रकाश पालवे, गोरक्षनाथ आव्हाड, अमोल गांगर्डे, सखाराम नाईकवाडे, अभिषेक खामकर, सुमन आव्हाड, आकाश त्र्यंबके, कमल आव्हाड, काकडे, निमसे, तिमलेश पासकंट्टी आदिंसह वृक्षमित्र उपस्थित होते.
श्री.त्र्यंबके पुढे म्हणाले, कोरोनाने ऑक्सिजनचे महत्व काय आहे हे सर्वांना दाखवून दिले. त्यासाठी वृक्षारोपण करुन त्याचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे. हे कर्तव्य या निमित्ताने आम्ही पार पाडत आहोत.
माजी नगरसेवक निखिल वारे रे यांनी सांगितले की, वृक्षारोपणाबरोबरच प्रदुषण मुक्तीसाठी स्वत:हून पुढे या. प्रभाग दोन हा प्लॅस्टिक मुक्त कसा होईल, याबाबत जनजागृती करण्यात येईल. पर्यावरणासाठी प्लॅस्टिक बंदी महत्वाची असल्याचे सांगितले
नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी यावेळी बोलतांना म्हटले कि, लोकांना सावली पाहिजे , फळे , फुले पाहिजे पण त्या झाडाचा पडलेला चालत नाहीत, ज्यांना हा झाडाचा कचरा चालत नाहीत ते उच्च शिक्षित असतात , त्यांच्याकडून या अपेक्षा नसतात, त्यामुळे अशा लोकांनी या कारणारवरून विरोध करणे उचित ठरत नाही शेवटी आयोजक योगेश पिंपळे यांनी सर्वांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वी होईल, आज वड, पिंपळ, आंबा, निलगिरी वृक्षांचे रोपण करण्यात आले. ज्या-ज्या ठिकाणी ही झाडे लावली तिथे राहणारे नागरिक स्वत:हून त्या झाडांचे संगोपन करणार आहेत. फौंडेशनच्या सहकार्यामुळे 100 झाडे रोपण करण्याचा संकल्प पूर्ण झाल्याबद्दल आभार मानले.