रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
“सुजलाम् सुफलाम् शेतकरी व क्षेत्र विकासाकरीता”
आपल्या बहूचर्चित असलेल्या एम सि एल प्रणीत व्ही सुमित्राज कॅप्टन बायोफ्यूल प्रायव्हेट लि. तसेच व्ही सुमित्राज कॅप्टन अग्रो फार्मर प्रोड्यूसर च्या सि एन जी गॅस प्रकल्पाचे ,चेअरमन कॅप्टन सुनिल डोबाळे यांचा वाढदिवस पपई कापून साजरा करण्यात आला.यावेळी कॅप्टन सुनिल डोबाळे यांनी उपस्थितांना पपईचे महत्त्व समजून सांगितले.
चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते ,वजन घटवण्यास मदतहोते ,रोगप्रतिका शक्ती वाढते ,मधुमेहींसाठी गुणकारी ,डोळ्यांचे आरोग्य सुधारते, सांधेदुखीपासून आराम मिळतो .पोटाचे विकार, अपचन यांवर पपई गुणकारी असते. पपइच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदय विकारामध्ये उपयोगी असतो. दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते. शरीराचे संवर्धन होते. पपईचे दुध पाचक, जंतुनाशक, उदाररोगहारक असते. यामुळे कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते. तसेच पपइच्या दुधात साखर घालून घेतल्याने अजीर्णही नाहीसे होते. कच्च्या पपइची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते. यापुढे उपस्थित सर्वांनी आपला वाढदिवस केक न कापता टरबूज, पपई सारखे फळ कापून साजरा करावा व शेतकऱ्यांना
फळबागेपासून भरघोस उत्पन्न मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना , असे मत कॅप्टन सुनिल डोबाळे यांनी मनोगतून व्यक्त केले.
उपसरपंच सचिन कोरडे, मंगेश कोरडे, गणेश खारोडे ,सुमित डोबाळे, श्याम राऊत , धीरज ढोबाळे, मंगेश मोहोळ , कमलेश जी राठी , योगेश निशाने , मंगेश डोबाळे,भास्कर खाजोड , विजय भाऊ इंगळे , प्रशांत प्रशांत पोके , मच्छिंद्र नागरे आदी कंपनीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.