संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत मधील सत्ताधारी ( सरपंच)विरुद्ध विरोधी गट (ग्रामपंचायत सदस्य) यांच्यातील संघर्षमुळे नेहमीच चर्चेत असते त्यांच्या या संघर्षामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. नवीन वादाचे कारण म्हणजे मागील काही दिवसापूर्वी ३० लाख रुपयांच्या कामाची निविदा केडगाव ग्रामपंचायत काढली असून ज्यांना टेंडर भरायचे आहे त्यांनी स्थळपाहणी करून त्याचा फोटो घेऊन जिवो टॅग करून सरपंचांचे सही व शिक्का असलेले पत्र जोडावे अशी नवीन अट त्यात टाकण्यात आली आहे.या अटीवर ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप ,दिलीप हंडाळ ,नितीन कुतवळ, यांनी आक्षेप नोंदवला असून त्या आक्षेपामागील कारण ग्रामपंचायत सदस्य दिलीप हंडाळ त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतीने जी कामाची निविदा काढली आहे त्या निविदेमध्ये ज्यांना टेंडर भरायचे आहे त्यांनी स्थळ पाहणी करून जिवो टॅग करून सरपंचांची सही व शिक्का असलेला पत्र जोडले त्याला अनिवार्य आहे हे पत्र जोडल्या नंतरच या टेंडर प्रक्रियेत भाग घेता येईल अशी ती जाचक अट टाकली असून सरपंच हे त्यांच्याच जवळील काही लोकांनाचं सही शिक्का देत आहेत व बाकीच्या मात्र ते सही शिका देत नसून बाकीच्यांना मात्र सही शिक्या साठी अडचण निर्माण केली जात आहे तर यातील काही ठेकेदारांनी सरपंच यांना संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत.त्यामुळे येणाऱ्या ८ तारखे पर्यन्त जर सरपंचाचे सही शिक्का असलेले पत्र त्या टेंडर प्रक्रियेला नाही जोडले तर टेंडर भरता येणार नाही त्यामुळे ही अट आणि हा प्रकार जाणून बुजून केला जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य दिलीप हंडाळ यांनी इतर दोन सदस्य सह केला असून हा प्रकार जर नाही थांबला तर तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी स्वरूपात कळवले असून केडगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनीही चालू असलेला प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवला असून मी माझी डेस्क ह्या प्रक्रियेत वापरण्यास विरोध करणार आहे असे ग्रामविकास आधिकारी काळे भाऊसाहेब सांगितले….