मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
स्नेह नगर, तकीया वार्ड, भंडारा. येथे 23 04/2023 चे दुपारी आनद मोहतुरे याच्या घरी कोणीही हजर नसताना घरात प्रवेश करुन, अज्ञात आरोपीने सुनामौका पाहुन त्यांच्या घराचा मागील दरवाज्यातुन प्रवेश करुन आलमारीतील रोख्य रक्कम व सोन्याचे दागीने चोरले. अशी पोलीस स्टेशन भडारा येथे दिनाक 23 04 2023 रोजी फिर्यादी आनद सदानद मोहतुरे, रा. स्नेह नगर, भंडारा यांच्या तक्रारीवरुन घरफोडी चा गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा च्या पथकातील नारायण तुरकुंडे, प्रीती कुळमेथे, सतिश देशमुख, शैलेश बेदरकर, बंडी मडावी, योगेश पेठे, सुनील ठवकर, आशीष तिवाडे, कौशीक गजभिये यानी घटनास्थळाची पाहणी केली व गोपनीय बातमीदाराना कार्यान्वीत केले.शैलेश बेदुरकर स्थानिक गुन्हे शाखा भडारा याच्या गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन घरफोडी करणारा साकोली येथील सगईत गुन्हेगार अनिल ख॒न्नीलाल बोरकर, जय 37 वर्ष, रा. शिवाजी वाई, साकोली व अक्षय दिनेश गुप्ता, वय 24 वर्ष, रा.शादीपुर डेपो, बेस्ट पटेल नगर, नवी दिल्ली, मु. शिवाजी बाई, साकोली. यानी दोघानी मिळुन केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. परंतु अनिल बोरकर व अक्षय गुप्ता हे दोघही चाणाक्ष असल्याने ते गुन्हा करीतांना कोणत्याही प्रकारच्या तात्रिक वस्तुचा वापर करीत नाही त्यामुळे त्याला गजा आड करणे जिकरीचे काम होते. त्याना जेरबद करण्याच्या मनसुब्याने दिवस रात्र एक करुन शोध मोहिम राबवली व सापळा रचुन मौजा भंडारा येथील जिल्हा परीषद चौकात अनिल बोरकर साग्खा दिसणारा व्यक्ती असल्याची खबर शैलेश बेद्ग्कर याना मिळाल्याने त्याच क्षणी अनिल बोरकर व अक्षय गुप्ता यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना स्थानिक गन्हे शाखा भंडारा येथे आणुन विचागप॒स केली तेव्हा त्यानी भडारा येथील घरफोडी केल्याचे कबुल केले. दोन्ही आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भंडारा, ब पोलीस स्टेशन वरठी हद्दीतील तिसरा साथीदार रवी रमेश माचेवार, वय 37 वर्ष, रा. नंदनवन नागपूर याच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केले असुन आरोपी नामे अनिल चुन्नीलाल बोरकर, वय 37 वर्ष, र. शिवाजी वार्ड, साकोली ब अक्षय दिनश गुप्ता, बय 24 वर्ष, रा. शादीपुर डेपो, बेस्ट पटेल नगर, नवी दिल्ली, ह. मु. शिवाजी वार्ड, साकोली याचेवर भंडारा, नागपुर, नागपुर (ग्रा.), गोंदीया, गडचिरोली, चद्रपुर, राजनादगाव (छ.ग.), डोंगरगढ (छ ग.) मध्य प्रदेश या जिल्ह्यात घरफोडी व चोरी अशा प्रकारचे असंख्य गुन्हे दाखल आहे. संपुर्ण विदर्भास हैरण करुन टाकलेल्या अशा सराईत तिनही आरोपी नामे (1) अनिल चुन्नीलाल बोरकर, वय 37 वर्ष, रा. शिवाजी वार्ड, साकोली, (2) अक्षय दिनेश गुप्ता, बय 24 वर्ष, रा. 2151/3.%25 शादीपुर डेपो, बेस्ट पटेल नगर, नवी दिल्ली. ह. मु. शिवाजी वाई, साकोली, (3) रवी रमेश माचेवार, बय 37 वर्ष, रा. नंदनवन नागपूर अशा गुन्हेगाराना पोलीस अधीक्षक लोहित मतानी . अपर पोलीस अधीक्षक ईधर कातकडे सा याच्या मार्गदर्शनात वरील सर्व नमुद पोलीस अधिकारी अमलदारानी अथक परिश्रम ब कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपीताच्या ताब्यातून (1) एक सोन्याचा शिक्का कि. ₹ 3,25.000 -, (2) बजाज pulsar160 कि. ₹ 1,60,000 – असा एकुण ₹ 4,85,000 – चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तिनही आरोपीताना पोलीस स्टेशन भडारा च्या ताब्यात पुढील कारवाई कगीता देण्यात आले.