दादासाहेब येढे
तालुका प्रतिनिधी, पाथर्डी
पाथर्डी : भारतीय स्टेट बॅंकेच्या पाथर्डी शाखेने स्पार्क्स लाईफ केअर, मुंबई यांच्या वतीने खातेदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि 6 रोजी करण्यात आले होते यामध्ये सुमारे 300 खातेदारांची मोफत तपासणी करण्यात आली
यावेळी भारतीय स्टेट बॅंकेचे शाखाधिकारी नितिन वानखेडे, क्षेत्रीय अधिकारी मनोज जाधव, विधी तज्ञ अॅड प्रतिक वेलदे, रोहित वाघ, विठठल भिसे, अतुल गोरकर, विश्वजित निंगफोडे, जितेंद्र गाडे, महेश लाड, बाळसाहेब काटे, निलेश बोरुडे, राहुल आव्हाड तसेच स्पार्क लाईपफ केअर, मुंबई यांच्या कडील डॉ निलेश सिंध, डॉ मधुकर आव्हाड, डॉ सुनिल बार्गे, विश्वंभर पवार, डॉ वैशाली गवाळे, डॉ समिर पिसे, मंगेश मेधा, मदन पिसे, आदिनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला यावेळे बॅंकेत आलेल्या सुमारे 300 खातेदार यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच रिपार्ट देण्यात आले तसेच योग्य उपचार तसेच आहार यावर मार्गदर्शन संबधीत तज्ञ डॉक्टर्स यांच्या कडुन देण्यात आले