संतोष खरात
जिल्हा प्रतिनिधी ठाणे
अक्षय भालेराव यांच्या परिवाराला १ कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली.
१ जुन रोजी नांदेड येथील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव खुन प्रकरणातील दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगीतले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे ते अक्षय भालेराव यांच्या परिवाराला १ कोटी रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.
अक्षय भालेराव यांच्या संपुर्ण परिवार आणि गावा सोबत दलित पँथर आहे.२ दिवस ते अक्षय भालेराव यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी जाणार आहे.आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री यांच्या कडे केली.