संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड तालुक्यातील काळेवाडी गावचे सुपुत्र श्री भाऊसाहेब चंद्रकांत वाळके यांची आताच् झालेल्या शासन पदोन्नती मध्ये रावेर तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे चंद्रकांत वाळके हे २०१३ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या उत्तीर्ण झाले होते त्यावेळेस त्यांची मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवड झाली होती त्यांनी प्रथम राजापूर तालुका जिल्हा रत्नागिरी येथे कार्यकाळ पूर्ण केला त्यानंतर तेथून ते मंडळ कृषी अधिकारी म्हणून पाली जिल्हा रायगड येथे सेवेची दहा वर्षे पूर्ण केली व त्यानंतर आता शासनाने त्यांची पदोन्नती करून रावेर तालुका कृषी अधिकारीपदी निवड केली असून त्यांच्या मूळ गावी काळेवाडी( दौंड) येथे पदोउन्नती मूळे आनंदोउत्सव साजरा करण्यात आला..