दादासाहेब येढे
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
पाथर्डी : दुलेचांदगाव,ता.पाथर्डी येथील सचिदानंद बंडोबा माध्यमिक विदयालयाने अनेक अधिकारी देण्याचे काम केले आहे तालुक्यात एक आदर्श शाळा आहे या ठिकाणी परीसरातुन तसेच पाथर्डी शहरातुन अनेक विदयार्थी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेताना दिसत आहे ज्यावेळी विदयार्थी त्यांच्या जिवनामध्ये यशस्वी होतात त्यानंतर देखील त्यांचे या शाळेविषयीचे आदर कायम रहातो ते सतत भेट देत असतात अशाचा येथील भाऊसाहेब कैलास ढोले, पोलिस उप अधिक्षक, हवेली पुणे ग्रामिण यांनी शाळेच्या सौरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सौरक्षक कंपाऊड दिले शाळेच्या स्थापना दिनी दि.2 रोजी या कामाचे उदघाटन विजय ढोले सर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आले. या वेळी संस्थेचे यशवंत ग्राम सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा अॅड अंकुशराव गर्जे साहेब, अशोक गर्जे साहेब,ह भ प तुकाराम महाराज चन्ने,सरपंच रणजित बांगर, चेअरमन गोपीनाथ बांगर, व्हा चेअरमन लहू गोसावी, तुकाराम सापते, चंद्रकांत घालमे गुरुजी, मुख्याध्यापक मदन चन्ने, पत्रकार बाबासाहेब गर्जे व मोठ्या संख्येने गांवकरी उपस्थित होते.
माजी विदयार्थी पोलिस उपअधिक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या कडुन शाळेस कंपाऊड