सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले — येथील श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने मार्च 2023 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत विद्यालयाचा निकाल 96.95 टक्के लागला आहे तर 90% हुन अधिक गुण मिळविणारे 29 विद्यार्थी आहेत. विशेष प्राविण्य प्राप्त 133 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 89 विद्यार्थ्यांनी यश मिळविले. संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी कै गुरुवर्य बा ह नाईकवाडी तथा बाबा यांनी घालून दिलेल्या आदर्श गुणवत्तेची यशाची परंपरा संस्थेच्या विविध विद्यालयातील निकालावरून दिसून येत आहे. अगस्ति विद्यालयाचा निकाल नेहेमीच वैशिष्ट्यपूर्ण व कौतुकास्पद राहिला असुन मार्च 2023 च्या शालांत परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक चव्हाण विश्व सुरेश ( 95.60 ), द्वितीय वैद्य सिद्धेश संभाजी ( 95 .00), मोताळे सृष्टी परशुराम( 95.00),तृतीय कु सदगीर प्रांजली बाळू (94.80),चतुर्थ कु हासे स्वरा चंद्रशेखर (94.60) ,कु सदगीर ऋतुजा भरत (94.60),घोरपडे ओंकार बाळासाहेब(94.60) पंचम कु खंडांगळे श्रावणी शरद (93.20)याप्रमाणे असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे , प्राचार्य शिवाजी धुमाळ, उपमुख्यध्यापिका सौ सुजल गात, पर्यवेक्षक मंगेश खांबेकर , संजय शिंदे व सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी, अध्यक्षा सौ शैलजा पोखरकर ,कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी , तसेच शाळा व्यवस्थापन समिती , पालक व ग्रामस्थ यांचेसह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











