निलेश बोरुडे
तालुका प्रतिनिधी श्रीगोंदा
श्रीगोंदा : निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. संत तुकारामांच्या या उक्ती मध्ये सांगितले आहे की निश्चय दृढ असेल तर कठीण परिस्थितीमध्ये पण कर्माचे फळ लाभत असते…
कृषी प्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात ज्ञांन परंपरेशी नात जोडत या क्षेत्रात अनेक नामवंतांनी आपले योगदान देवून या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. गुरुकुल पद्धती पासून ते ऑनलाईन शिक्षण पद्धती परेंतचा प्रवास आपण अनुभवत आहोत. शिक्षण क्षेत्रात अनेक माध्यमांनी योगदान देणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपल्या सेवाभावान, संपूर्ण आस्थेनं आणि जीव ओतून या क्षेत्राला काही योजन पुढे नेल आहे असेच भरीव ज्ञानदानाचे काम करणाऱ्यांपैकी श्री.मल्हारी प्रभू शिर्के उर्फ MP शिर्के सर हे एक आहेत.अतिशय खडतर परिस्थिती मध्ये बाबुर्डी या छोट्याशा खेड्यात आपले प्राथमिक शिक्षण घेत पुढे मढेवडगाव येथे माध्यमिक शाळेला 6/7 किलोमिटर खडतर रस्त्याने पायी जात 10 वी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना केवळ शिक्षणाची ओढ असल्याने आपले उच्च शिक्षण श्रीगोंदा येथून Bsc मध्ये पूर्ण केले त्यानंतर पुणे येथे B.ed केले.सरांनी आपल्या सेवेची सुरुवात 18 जून 1990 ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या वांगदारी येथील विद्यालयातून केली.
स्वभवतालच्या परिस्थीती बद्दल कसलीच तक्रार न करता उपलब्ध साधन सामग्री आणि अंगी असलेल्या क्षमतांचा मेळ घालत अविरत 32 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत हाती घेतलेल्या कार्यातून ध्येयाकडे वाटचाल करत आहेत.ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली असल्याने संस्थेच्या इतर विद्यालयात शिक्षण सेवा देत घारगाव, चिखलठनवाडी, चिंभळे,लिंपनगाव येथे अविरत सेवा देत 31 मे 2022 रोजी अजनुज येथे निवृत्त होत आयुष्यातील नवीन पर्वाची सुरुवात केली.साधारण पणे निवृत्त झाल्यानंतर अनेक शिक्षक शिक्षण काळात राहून गेलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळ देतात. शिर्के सरांनी देखील आपल्या निवृत्ती नंतर जीवनाची सुरुवात केली परंतु अध्यापनाची असलेली आवड आणि सामजिक कार्यात योगदान देण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बाबुर्डी या छोट्याशा गावातून शिक्षण घेवून ग्रामीण भागातील विद्यार्थांनी या स्पर्धेच्या युगात आपली वेगळी ओळख निर्माण या विचारांनी त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. यातच 2022/23 या शैक्षणिक वर्षात बाबुर्डी येथे १ली ते ८वी पर्यंत शाळेत २११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ८ वर्ग सुरू असलेल्या शाळेमध्ये ७ च शिक्षक उपलब्ध असल्याने एक शिक्षक उपलब्ध होवू न शकल्याने M.P. शिर्के सरांनी मुख्याध्यापक कुचेकर सरांशी चर्चा करून वीणा मोबदला शिक्षण सेवा देण्याचा विचार मांडला याला संमती देवून मागील एक वर्षापासून ते विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करत आहेत विशेष म्हणजे उन्हाळी सुट्ट्या मध्ये विध्यार्जनात खंड नको म्हणून उन्हाळी मोफत तासिका घेवून गावातील गरजू हुशार विद्यार्थ्यांना ते ज्ञानदान देत आहेत.दरम्यान शिक्षण सेवक या आदराच्या स्थानावर काम करत असताना त्यांना दिवंगत मुख्यमंत्री त्यांच्या कार्याचा गौरव करत सत्कार झाला आहे तसेच त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सरांनी त्यांच्या सेवा काळात काम करत असताना स्मार्ट पी. टी. मध्ये राज्य पातळीवर तज्ञ मार्गदर्शनाचे कामकाज पाहिले आहे. सरांनी जागतिक शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ६ देशांचा अभ्यास दौरा देखील केला आहे.
माणसाने माणसाचा केलेला विकास हाच समजाचा विकास हेच सूत्र अंगिकारून सरांनी आपल्या ज्ञांनदानाच्या कार्याचा पाया घातला. आणि हाच शिर्के सरांचा आदर्श विचार आपणास निश्चित विचार करण्यास भाग पाडतो. शिर्के सर हे एक सर्व समावेशक निर्गवी, निस्वार्थी आणि नम्र व्यक्तिमत्त्व आहे.एखाद काम हाती घेतल्यानंतर कसं तडीस न्याव याच कसब याची एक कला वेगळीच असते. सेवानिवृत्ती किंवा सेवापूर्ती ही एक कृत्रिमता आहे.कारण सेवा अनंत आहे. सेवेची समाप्ती किंवा पूर्ती कधीच होवू शकत नाही करता ही येणार नाही फक्त सरकारी वय होत आणि प्रशासकीय व्यवस्थेतून ती व्यक्ती बाहेर पडते. एक सेवा संपत आणि दुसरी सुरू होते. ही एक समजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्याची संधी समजून शिर्के सरांनी बाबुर्डी व सोमेश्वर विद्यालय सांगवी फाटा येथे विनामूल्य ज्ञानदानाचा वासा घेवून तो अनंत सुरू ठेवण्याचा निश्चय केलेला आहे. सरांच्या या कार्यास व शिक्षण क्षेत्रात कोणीच शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून घेत असलेल्या कष्टांना समजासमोर आणुन एक आदर्श शिक्षकाने ठरवल्यास काय करू शकतो हे उदाहरण समाजासमोर आणि इच्छित आहोत. सेवानिवृत्त शिक्षकासाठी हा एक निश्चित आदर्श ठरू शकतो. बाबुर्डी या छोट्याशा खेडे गावातून सर्व स्थरांमध्ये उच्च अधिकारी व्हावेत यासाठी गावामध्ये अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्याचा सरांचा विचार आहे. श्रीगोंदया मध्ये सरांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असताना दिसत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)