मधुकर केदार
तालुका प्रतिनिधी शेवगाव
ढोरजळगाव : शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत ढोरजळगाव येथे आज सरपंच सौ रागिणि सुधाकर लांडे उपसरपंच श्री राजेंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परिसरातील ग्रामस्थांना त्यांच्या मागणीनुसार विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळकत उतारे सातबारा उतारे जन्म मृत्यू दाखल्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण विभागामार्फत या वर्षापासून दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार अनुक्रमे हिराबाई बर्गे अनिता म्हस्के उषा थोरात निर्मलाताई देशमुख अनिता बांगर रंजना गाडगे यांना ग्रुप ग्रामपंचायत ढोरजळगाव मार्फत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी तलाठी कृषी अधिकारी यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला. व रोख रक्कम शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते वरील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच श्री सुधाकर लांडे व श्री साईनाथ गरड यांच्या सेवापूर्ती सोहळा निमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी श्री बी.आर.बढे कृषी अधिकारी श्री सुनील होडशीळ कृषी सहाय्यक रवींद्र ढाकणे मंडलाधिकारी श्री एजी शिंदे तलाठी श्रीमती सोनाली गोलवड ग्रामपंचायत सदस्य श्री विष्णुपंत गरड रोहन साबळे गणेश पाटेकर पांडुरंग सांगळे श्रीमती वर्षा राणी नन्नवरे छाया गिरे सुवर्णा गिरे चंद्रकला बांगर समिंद्रताई गरड यांचे सह श्रीदेवी दास देशमुख संभाजी लांडे,भी वसेन केदार,जयकुमार देशमुख, संतोष केदार, मधुकर केदार साईनाथ गरड, जालिंदर गिरे,सुधाकर गिरे,शरद बांगर,अतुल लांडे,भगीरथ वाघमारे,भारती कंगनकर,भीमराज साबळे, रोहिदास तुजारे व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री देविदास देशमुख यांनी केले. व ग्राम विकास अधिकारी श्री बढे बि आर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.