अजिज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : नगरपंचायत ढाणकी च्या हद्दीत प्रभाग क्रमांक दहा मधील सार्वजनिक विहिरीला आज पन्नास वर्षे ऊन अधिक पूर्ण झाले असून. या पन्नास वर्षात सार्वजनिक विहिरीत आजपर्यंत अनेक लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता काही लोक पाणी भरत असताना विहिरीत घसरून मृत्यू पण झाला व याच विहिरीत सात ते आठ लोकांनी आत्महत्या केले. ही विहीर नागरिकाच्या जीवाला धोक्याची आसून ही बाब लक्षात घेऊन. अनेकांनी सुरक्षा साठी प्रयत्न प्रयत्न केला परंतु त्यांना यश काही मिळाले नाही. नगरसेविका रिजवाना परवीन शेख समीर यांनी या समस्या च्या निर्वाण करण्यासाठी मागील तीन वर्षापासून रात्र दिवस प्रयत्न करीत होती. शेवटी आज त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले.प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका यांनी जिद्द चिकाटी चे ,शर्यती चे प्रयत्न करुन व वरिष्ठांना सोबत घेऊन व विनंती करून अखेर या समस्याचा सफलतापुर्वक निकाल लावण्यात आल . व विहिरीला लोखंडी जाळी टाकुन सुरक्षित केली. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे तीन ते चार प्रभागाचे नागरिक पाणी भरण्याकरिता या विहिरीवर येतात १०,११,१२,१७ या प्रभागातील पाणी भरण्यासाठी येणाऱ्या माय माऊली व जनतेनी प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका चागले कार्य केल्याबद्दल स्तुती व अभिनंदन केले.


