पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : ७५ वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षात ७५ हजार पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून.
त्या अंतर्गत ग्रामविकास विभागातील राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषदांमध्ये भरण्यात येणार आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषद गट क मध्ये 35 संवर्गातील अंदाजे 907 पदे सरळसेवेने भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
लवकरच (Yavatmal ZP) जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
याबाबत आयबीपीएस या कंपनीशी सामजंस्य करार होऊन जाहिराती संबंधी कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यात जि.प. अंतर्गत पुढील संवर्गाची पदे भरण्याचे प्रस्तावित आहे.
आरेखक 1, आरोग्य पर्यवेक्षक 2, आरोग्यसेवक (पुरुष) 40 टक्के 9, आरोग्यसेवक (पुरुष) 50 टक्के 90, आरोग्यसेवक (महिला) 218, कंत्राटी ग्रामसेवक 52, कनिष्ठ अभियंता 18, कनिष्ठ लेखाधिकारी 2, कनिष्ठ सहायक (लिपिक) 55, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 13, जोडारी 1, पशुधन पर्यवेक्षक 17, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3, लघुलेखक (उश्रे) 1, लघुलेखक (निश्रे) 1, वरिष्ठ सहाय्यक लिपिक 3.
वरिष्ठ सहाय्यक लेखा 8, विस्तार अधिकारी (कृषी) 5, विस्तार अधिकारी (पंचायत) 2, विस्तार अधिकारी (शिक्षण) 18, विस्तार अधिकारी (सािं’यकी) 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 28, पर्यवेक्षिका 10, कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) 27, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 2, आरोग्य सेवक (पुरुष) पेसा 40 टक्के 30, आरोग्यसेवक (पुरुष) पेसा 50 टक्के 45, आरोग्यसेवक (महिला) पेसा 109, पर्यवेक्षिका पेसा 4, पशुधन पर्यवेक्षक पेसा 19. या नुसार रिक्त पदे भरण्यात येणार असून स्वर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळाली हे नक्कीच..


