सचिन उबाळे
तालुका प्रतिनिधी महागाव
महागाव : तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे व जीवन पांडुरंग आंडगे यांच्या शेतात जाण्यासाठी असणारा पांदण रस्ता तात्काळ खुल्ला करून द्या व शेतात कोणतेही वाहन जात नसल्यामुळे त्यांचा ऊस अघाप ही शेतात उभा आहे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, रस्ता खुला करून देण्यासाठी त्यांनी ७ वेळा वारंवार प्रशासनाला निवेदने दिली व महागाव तहसील कार्यालयासमोर दि.५ डिसेंबर २०२२ आमरण उपोषण केले होते व त्यावेळी उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिले तरी सुद्धा सदर पांदण रस्त्याचं काम कोणत्याही प्रकारे सुरुवात नाही झाले यावर प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही त्यांच्या शेतात आजही ऊस उभा आहे त्यामुळे शेतकरी आंडगे यांनी दुसऱ्यांदा काल दि. १ मे २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याला सुरुवात केली आहे पण दुसऱ्या दिवशीही कोणताही तोडगा निघाल्यामुळे उपोषण कायम आहे आंडगे यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ , तहसीलदार महागाव, ठाणेदार महागाव यांना निवेदन देऊन पांदन रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा अशी मागणी केली होती अवकाळी पावसाचा फटका उपोषणकर्त्या शेतकऱ्याला बसत असून शेतकऱ्याच्या जीवितवास धोका निर्माण झाला आहे बैल जोडी सुद्धा पडणाऱ्या पाण्यामुळे भिजत आहे पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याशिवाय व शेतात उभ्या असलेल्या उसाचा पंचनामा केल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही या आपल्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहे.