अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दि.25/12/2022 रोजी शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून आमदार चषक विदर्भ स्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. पातुर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज क्रीडा नगरी तुकाराम गाडगे नगर येथे 23 डिसेंबर ते २५ डिसेंबर या तीन दिवसांमध्ये विदर्भातील सर्व कबड्डीपटूच्या स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमोल मिटकरी विधान परिषद सदस्य तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख स्वागत अध्यक्ष कृष्णा अंधारे प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष विजय देशमुख , जगदीश मुरूमकार पाटील , दत्तात्रय नागरी सहकारी पतसंस्था संचालक, प्राध्यापक संजय देशमुख , जगदीश चव्हाण , सतीश डफडे स्पर्धा कन्व्हेनर, पद्मकरराव देशमुख स्पर्धा निरीक्षक,भगवान डहाळे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल ,रवी गीते कार्याध्यक्ष अकोला महानगर युवक ,अब्दुल रहीम पेंटर माजी नगरसेवक मनपा अकोला, मोहम्मद सलीम, प्राध्यापक सुरेश लुंगे क्रीडा मार्गदर्शक, माजी राष्ट्रीय खेळाडू बळीराम घुगे, रमेश जाधव ,बबन जाधव, परशरामजी उंबरकर राष्ट्रीय खेळाडू मोहन जाधव ुरेंद्र उगले ,सक्षम प्रतिष्ठानच्या विश्वस्त निर्मला गाडगे ,सोनल खंडारे , प्रणाली उमाळे ,अनिता ताई बंड ,सामाजिक कार्यकर्ते सुधाकर शिंदे, निरंजन बंड पातुर स्पोर्ट क्लब अध्यक्ष हे होते.तीन दिवसीय चाललेल्या पुरुष व महिला आमदार चषक कबड्डी स्पर्धेमध्ये संपूर्ण विदर्भातून पुरुषांचे 26 संघ तर महिलांचे नऊ संघ यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता तीन दिवस चाललेल्या कबड्डी स्पर्धेला पाहण्याकरिता क्रीडा प्रेमींची महिलांसह प्रचंड गर्दी झाली होती पातुर शहरांमध्ये प्रथमच आमदार चषक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याने क्रीडा प्रेमींमध्ये मोठा उत्साह संचारला होता या स्पर्धेमध्ये अमरावती येथील समर्थ क्रीडा मंडळ यांनी प्रथम क्रमांक मिळवीत आमदार चषकासह रोख 41,000 Rs पटकावला तर महिलांमध्ये रवींद्र क्रीडा मंडळाच्या उमरेड जिल्हा नागपूरच्या संघाने आमदार चषकासह 31,000 Rs पटकाविला आमदार चषक विजेता पुरुष प्रथम क्रमांक समर्थ क्रीडा मंडळ अमरावती द्वितीय क्रमांक साई स्पोर्ट क्लब विदर्भ तृतीय क्रमांक गाडगेबाबा क्रीडा मंडळ अमरावती आणि सुवर्णयोग क्रीडा मंडळ यवतमाळ महिलांमध्ये आमदार चषक विजेता प्रथम क्रमांक रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड जिल्हा नागपूर द्वितीय क्रमांक साई क्रीडा मंडळ काटोल जिल्हा नागपूर तृतीय क्रमांक मराठा नागपूर आणि साई स्पोर्ट क्लब विदर्भ उत्कृष्ट खेळाडू महिला रविंद्र क्रीडा मंडळ उमरेडच्या हर्षा खडसे आणि काटोलच्या तनु ठाकरे यांनी बहुमान पटकाविला.सदरच्या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सक्षम प्रतिष्ठान चे विश्वस्त स्वप्निल थोरात, श्याम गाडगे, भारत फुलारी ,विजय गाडगे ,गोलू मोरे, अंकित गाडगे, चैतन्य ढोकणे, अतुल गाडगे, विठ्ठल फुलारी ,डिगंबर गाडगे, अजबराव ताले ,देवराव चव्हाण, महेश जाधव, किशोर फुलारी, अमोल इंगळे, शंकर देशमुख, सुधीर देशमुख ,बंडूभाऊ देवकर सचिन गणे्शे ,श्रीधर परमाळे ,गणेश पाटील ,नितीन वानखडे, दत्तात्रय पाटील, अथर्व गाडगे ,गोपाल जाधव ,अमोल गाडगे ,अजय गायकवाड, यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप काळपांडे व विश्वनाथ इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन मोहन गाडगे यांनी केले.