कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : नागपूर हिवाळी अधिवेशन वर दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्था द्वारा दिव्यांगांच्या समस्या मागण्या सोडविण्याकरिता दिव्यांगांचा भव्य मोर्चा काढण्यात आला दिव्यांकांच्या विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आली होती या मोर्चाला दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला त्यावेळी दिव्यांगांचा असलेला दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या योजना याची माहिती संबंधित कार्यालयामध्ये दर्शनी भागावर दिसेल अशा ठिकाणी त्याचे फलक लावण्याबाबत. दिव्यांगांना ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका विधानपरिषद मध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासह दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये मानधन वाढ करणे इत्यादी मागण्या सह विविध मागण्या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आल्या हा मोर्चा विधानभवनाकडे कूच करताच या मोर्चाची दखल घेत राज्यांचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोर्चातील शिष्टमंडळा सोबत चर्चा करण्यासाठी आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावले त्यावेळी मंत्री महोदयासोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली या चर्चेअंती मंत्रिमहोदयांनी संबंधित मागण्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दिव्यांगांच्या मागण्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे मोर्चेकर्यांनी समाधान व्यक्त करत महाराष्ट्र सरकारचे व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले या मोर्चाचे चे नेतृत्व राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्था नागपूर अध्यक्ष त्रेबंक मोकासरे, सचिव वर्मा तेलंग, दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जाधव, राज्य उपाध्यक्ष बाळू मांडवकर, महिला कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांता सुतार, ऑरेंज सिटी असोसिएशन ऑफ नागपूर चे अध्यक्ष इंद्रकुमार मालिक, सचिव रवी रक्षेल यांनी केली त्यावेळी मोर्चामध्ये मोहन दि कोंडावार नरेंद्र सोनवणे निलेश राऊत उषा लांबट शेख तहसीलसह संघटनेचे
पदाधिका-या सह विदर्भातील हजारोच्या संख्येने दिव्यांगांनी आपली उपस्थिती दर्शविली